Bhimarupi lyrics in marathi
॥ भीमरूपीस्तोत्र ॥ भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥ दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥ ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥ ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥ कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥ आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥ अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्र